Amazing Architecture khidreshwar temple

khopeshwar temple


........ मग काय चाललंय...??? कसे आहात तुम्ही...? आशा करते की सगळे छान मजेत असतील....

              काळजी घ्या.. मास्क वापरा...

👉चला तर मग सुरू करूया... मी आज तुम्हाला अशा स्थळा बद्दल माहिती सांगणारे जे तुम्हाला कदाचित माहीत नसेल किंवा तुम्ही ऐकलं ही नसेल... असो... आपण सुरू करूया....🤗

       ...... आणि पाषणांच्या प्रेमात पडले

19 जानेवारी ....जेव्हा मी या स्थळाला भेट दिली..कोल्हापूर वरून परतत असताना आम्ही या स्थळाला भेट दिली... जेव्हा या स्थळाबद्दल ऐकलं तेव्हा अस वाटलं की हे मंदिर बाकीच्या मंदिरा सारखेच असेल....पण जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा ते मंदिर पाहून च मी त्याच्या प्रेमात पडले.....

आता तुम्ही विचार करत असताल की यात काय येवढं विशेष प्रेमात वगैरे पडण्यासारखे.... तर तेच सांगणार आहे की यात अस खुप काही आहे हे मी सांगून पण तुम्हाला नहीं कळणार तेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष भेट द्यावी लागेल..... तेव्हा तुम्ही ही आपोआप त्याच्या प्रेमात पाडलं.....असो...माझा उद्देश एवढाच की तुम्हां ला ही या मंदिरा बद्दल माहिती कळावी....


कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्पस्थापत्यशैलीचे दगडी मंदिर आहे. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. कट्यार काळजात घुसली (चित्रपट) या मराठी चित्रपटातील 'शिव भोला भंडारी' या गाण्याचे चित्रीकरण या मंदिरात झाल्यामुळे पूर्वी काहीशा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे.


कोपेश्वर मंदिर आणि जैन मंदिर यांच्यावरील अनेक शिल्पाकृती मध्ये साम्य आहे... अनेक शिल्पाकृती त्या त्या मंदिराच्या शिल्पाकृती आहेत.. मंदिर निरीक्षण करताना त्या भावमुद्राापाहून जे उस्फुर्त सुचले ते यातून व्यक्त केल आहे... 


कोपेश्वर मंदिरावरील रामायण कालीन प्रसंग, काळभैरव, गणपती, भवानी, महिषसुरमर्दिनी, ब्रम्हा विष्णु महेश, सरस्वती, चामुंडी यांची ही शिल्पे विशेष आहेत...

कोपेश्वर मंदिर पाहून अनेकांच्या मनात विचार येऊन जातो(जसं की माझ्या आला) हे मंदिर कोणी बांधलं असेल कसं बांधलं ..?तसेच मंदिरातील मूर्ती ची तोडफोड कोणी केली असेल..? यावर खुप जणांनी संशोधन केलं सखोल अभ्यास केला असे तिथल्या माहित सांगणाऱ्या व्यक्तीने सांगितलं...

                     कोपेश्वर मंदिर

कोपेश्वर मंदीर
  महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्पस्थापत्यशैलीचे दगडी मंदिर आहे




कोपेश्वर मंदिर हे वास्तुशास्त्र व शिल्पकला यांचा मनोहर संगम आहे.. सुमारे दीड हजार वर्षे पूर्वीचे शिल्पकला कशी बहरला आली होती याचीच जणू हे मंदिर साक्ष देत आहे...
कोपेश्वर हे शंकराचे च नाव... भारतभर सर्वात जास्त  देवाचे मंदिरे असणारे दैवत म्हणजे शंकर.... गाभाऱ्यात शिवलिंग आणि बाहेर नंदी असे चित्र जवळपास सगळ्या मंदिरात पाहायला मिळते. ईथे तसे नाही. चार वैशिष्ट्य पूर्ण प्रकाराने हे मंदीर इतरांपेक्षा  वेगळे आहे.

वेगळ्या असणाऱ्या गोष्टी खालीलप्रमाणे:

1.गाभाऱ्यातील वेगळेपणा

इथे गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर प्रथम नजर पडते ती पिंडीच्या समोर असलेल्या शालुंकेवर हीच ती विष्णूची प्रतीकात्मक मूर्ती धोपेेेेश्र्वर...हिची उंची शिवलिंग पेक्षा जास्त आहे. गाभाऱ्यात दोन लिंगाची स्थापना केली आहे.
मंदिरातील गाभाऱ्यात मधोमध शिवलिंग व त्यांच्या पूर्वेला विष्णुरुपतील लिंग स्थपनेमागे कथा निगडित आहे.





शंखनाथ(संकेश्र्र), बंकनाथ (रायबाग),व कोपणाथ (खिद्रेश्र्वार) या तीन ठीकणाच्या  लिंगाचे दर्शन जो एक दिवसात करेल त्याला स्वर्गात प्रवेश मिळेल असा वर शंकराने आपल्या भक्ताला दिला. शिवभक्तांची संख्या स्वर्गात वाढू लागली त्यांची अडचण देवांना होऊ लागलीीत्यांनी या वरचा भंग करण्याची विनंती भगवान श्री विष्णुना केली . ते कोपनथ जवळ येऊन राहिले व वर निकामी झाला. इथे शिवलिंग दर्शनपूर्वी विष्णू दर्शन होते.




              2. *नंदी नसलेला सभामंडप*
शिवदर्शन घेण्यापूर्वी नंदी च दर्शन घेण्याची परंपरा आहे.येथील मंडपात नंदी नाहीी प्रजापाठी दक्षाच्या 16 कन्यापैकि सती ही सर्वात लहान होती. सर्वांच्या विरोधाला न जुमाणून तिने शंकराला वरले. दाक्षाच्या मनात शंकराला स्थान नव्हते... .दक्षान
 वाजपेयी यज्ञात शंकराला बोलावले नाही. आपल्या लहान कन्येला ही बोलवलं नाही. पण सतीने माहेरी जाण्याचा हट्ट धरला. शंकरांनी तिला नंदी सोबत माहेरी पाठवले म्हणून इथे नंदी नाही.... दक्ष यज्ञ घडलेले पौराणिक  याडुर इथून दक्षिणेला कृष्णा नदीच्या पलीकडे आहे.




       
माहेरी गेल्यावर सतीच अपमान झाला तसेच पतीचा ही अपमान झाला. अपमान सहन न झाल्याने सतीने धगधगत्या यज्ञकुंडात आत्महुती दिली.शंकराला हे समजताच त्याने विरभद्राला आवाहन केले व दक्ष यज्ञाचा विध्वंस करायला सांगितले.शंकराने क्रोधाने आपल्या जटा भूमीवर आदळून इथे क्रोध प्रकट केला....

कोपेश्वर नावाच्या उत्पती मागे ही पौराणिक कथा आहे..


                 3.*सभा मंडप*

मंदिराच्या मांडणीत सर्वसाधारणपणे आतील गाभारा व त्याला लागून सभामंडप असतो. सभामंडपाला रंगमंडप ही म्हणले जाते . तटबंदी असेल तर नगारखाना असतो. तटबंदीला 2 ते 4 स्वर्गमंडपतून विलोभनीय आकाश दर्शन होते.


हा स्वर्गमंडप 48 खांबावर उभारलेला आहे.चार प्रमुख दिशांना चार प्रवेश द्वार आहेत. आकाशाच्या दिशेने 13 फूट व्यासाचे गवाक्ष असून त्याच्या खाली बरोबर त्याच मापाची बरोबर 13 फूट व्यासाचीीअखंड रांगशिला असून भोवती 12 खांब वर्तुळकृती आहेत.


                  
                     *अप्रतिम शिल्प वैभव*

शिल्पकलेने नटलेल्या मंदिरात कोपेश्वर चे मंदिर एका वैशिष्ट्यं ने वेगळे आहे.मंदिराच्या बाहेरच्या बाजूला देव,देवता, स्त्री-पुरुषांची जी शिल्पे आहे तिला नरपट्ट असे म्हणतात.आणि त्या नरपत्ताखली गजपत्त आहे तो कुठे ही पहायला मिळण शक्य नाही.

जुन्या काळापासून चालत आलेल्या परंपरेची शिल्पे तुम्हां ला इथे पहायला मिळतील जे तुम्ही याआधी कधी पाहिली ही नसतील....









अंदाजे दीड हजार वर्षे पूर्वीचे आपल्या देशात तील जीवन शैली आपल्याला या शिल्पाच्या माध्यमातून पहायला मिळते.






ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते comment 👆मधून नक्की कळवा... याचा पूर्ण व्हिडिओ मी लवकरच utube वरती upload 👍करणार आहे.कारण ही माहिती लिहून लोकांपर्यंत पोहोचवणे खुप कठीण आहे... so मी याचा video द्वारे तुम्हां ला सांगणार आहे....तर मला नक्की सांगा हा blog कसा वाटला....🤗


Tʜɴᴀᴋ ʏᴏᴜ..

Comments

Popular Posts